आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (2024)

गेल्या दोन निवडणुकांमध्ये एक वोट आणि एक नोटचे नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला गंडवले.

Written by लोकसत्ता टीम

कोल्हापूर

आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (1)

कोल्हापूर : गेल्या दोन निवडणुकांमध्ये एक वोट आणि एक नोटचे नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला गंडवले. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत के. पी.पॅटर्नला पसंती देत या आमदारांना सभासदांनी दारूण पराभवाची धूळ चारली. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज आल्याने केवळ माझ्यावरील रागापोटी हजारो ऊस उत्पादकांची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या बिद्री कारखान्याला बदनाम करण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करीत आहेत. ‘

रात्रीच्या अंधारात बिद्री’ची झालेली चौकशी केवळ राजकीय हेतुने झाली असून हा त्यांचाच प्रताप आहे, असा थेट आरोप बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष , माजी आमदार के पी पाटील यांनी आमदार प्रकाश आबीटकर यांच्यावर सोमवारी केला. राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची चौकशी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले. तपासणी पथकाने केलेल्या तपासणीत अक्षेपार्ह असे काहीही सापडले नाही. बिद्रीचा कारभार पारदर्शी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या कारवाई पाठीमागे महायुतीचे उमेदवार पराभुतद झाला, नुतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचे मुदाळ गावच्या ग्रामपंचायतीच्या वतिने केलेल्या स्वागतास माझी उपस्थिती व शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात माझा सहभाग हि प्रमुख कारणे आहेत.

आणखी वाचा
आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (2)

पराभवानतंरही कपिल पाटील यांच्या बैठकांच्या धडाक्यामुळे किसन कथोरे समर्थक अस्वस्थ

आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (3)

अकोला : गरिबांच्या साड्यांमध्ये देखील दलाली, नाना पटोले यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; अपशब्दांचा वापर

आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (4)

काही संस्थांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’! मुख्यमंत्र्यांचा दावा, मविआने खोटे कथानक पसरविल्याचा आरोप

आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (5)

सरसंघचालक मोहन भागवतांची योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा; लोकसभा निकालांनंतर बैठक, अनेकांच्या भुवया उंचावल्या!

आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (6)

मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चलबिचल

आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (7)

नोकर भरतीचा गोंधळ, सामाजिक योजनांना कात्री सरकारच्या अंगलट! विद्यार्थी आंदोलने, मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधाऱ्यांना भोवले

आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (8)

नोकर भरतीचा गोंधळ, सामाजिक योजनांना कात्री सरकारच्या अंगलट! विद्यार्थी आंदोलने, मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधाऱ्यांना भोवले

आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (9)

बधाई हो! शपथविधी आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव; मालदीवसह विविध देशातील नेत्यांकडून अभिनंदन!

हेही वाचा : कोल्हापूर: टोल हद्दपार करणारच; विराट मोर्चाद्वारे आजऱ्यात टोलला सर्वपक्षीय विरोध

यावर ते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराचा आम्ही प्रामाणिकपणे प्रचार केला. मात्र लोकमत त्यांच्या विरोधात असल्याने जनतेने आपल्या मनात ठरवलेला निर्णय मतदानात व्यक्त केला. तसेच मुदाळ गावच्या सरपंच माझ्या सुनबाई असल्याने राजशिष्टाचार म्हणून मी त्याठिकाणी उपस्थिती दर्शवलेली गैर नाही. त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्गामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर बागायत जमिनी जाणार असून बहुतांश शेतकरी भुमिहिन होणार आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून सबंधीत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडणे हे माझे कर्तव्यच होते. ते पुढे म्हणाले, “सत्तेची दहा वर्षे विकास कामे कमी आणि बिद्रीच्या प्रगतीला अडथळा जास्त अशी कारकीर्द असलेले आबिटकर हे केवळ बिद्री आणि के. पी. द्वेषाने पछाडलेले आहेत.

हेही वाचा : शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनास विरोध

गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये दिवस रात्र बिद्रीची प्रगती कशी रोखता येईल यासाठीच ते शासन दरबारी कार्यरत राहिले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्याला सभासद होता यावे यासाठी आम्ही केलेला प्रयत्न त्यांनी न्यायप्रविष्ट केला. बिद्रीच्या प्रगतीचा शिलेदार ठरलेल्या सहवीज प्रकल्पात त्यांनी जमेल तेवढे अडथळे आणले. राज्यात अव्वल ठरलेल्या सहवीज प्रकल्पाच्या टॉवर लाईनला विरोध करुन प्रकल्प चालू करण्यापासून रोखला. सुमारे १२० कोटीच्या प्रकल्पाचे व सभासदांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. डिस्टलरी प्रकल्पाचे इरादापत्र व अन्य अनुशंगिक परवाणे व लायसन्स कोणी अडविले हे साऱ्या महाराष्ट्राला समजले. उच्च कार्यक्षमतेच्या मिळालेल्या पुरस्कारांविषयी त्यांनी शंकांचे वादळ उठवीत खोटे नाटे आरोप केले. विस्तारीकरण मंजुरीच्या फायली सत्तेच्या जोरावर तब्बल दोन वर्षे निर्णयाविना अडकवून ठेवल्या. टेस्ट ऑडिटसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर सत्तेचा गैरवापर करून कुणी दबाव टाकला हे ही उभ्या महाराष्ट्राने पाहिले. सहकार व पणन विभागाने सभासद भागभांडवल १५ हजार रुपये करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील अन्य कारखान्यांच्या बरोबरच आम्ही लागू केला; परंतु सभासदांची आर्थिक ओढाताण होऊ नये, म्हणून आम्ही टप्पे घालून दिले. याबाबतही या आमदारांनी आगपाकड केली व न्यायालयात दावा दाखल केला. नसलेल्या पावसाचे कारण पुढे करीत बिद्रीची निवडणूक केवळ सत्तेच्या जोरावर पुढे ढकलली. पण सभासदांनी योग्य मुहूर्त काढला आणि बिद्रिच्या चिमणीवर वाकडी नजर टाकणाऱ्या आमदारांना सभासदांनी त्यांची योग्य जागा दाखवली. आता विधानसभेचे घोडे मैदान दूर नाही. जे बिद्रीच्या सभासदांच्या मनात आहे तेच राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदारच हा हिशोब चुकता करणार आहेत. आमदारांना याची जाणीव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच ते कुरघोडीचे राजकारण करीत आहेत. त्यांच्या खोके भूमिके विषयी जनतेची खात्री झाल्यामुळे आपली अडचण होते की काय अशी भीती आमदारांना वाटल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सत्तेच्या जोरावर दडपशाहीने बिद्रीची तपासणी करण्यास भाग पाडले. अशी आमचीही या घडीला खात्री झाली असून याबाबतचे सत्य काय आहे ते लवकरच जनतेसमोर येईल. गेल्या निवडणुकीत अशा घाणेरड्या राजकारणाला बिद्रीच्या सभासदांनी चोख उत्तर दिले आहेच. येत्या विधानसभा निवडणुकीतही अशीच लोकभावना असल्याने या लोक भावनेचा आदर सन्मान करण्यासाठी मी या रणांगणात निश्चितपणे उतरणार आहे.”

© The Indian Express (P) Ltd

More Stories onआमदारMLAकोल्हापूरKolhapurसाखरSugarसाखर कारखानाSugar Factory

Latest Comment

View All Comments

Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In kolhapur kp patil alleged that investigation of bidri factory due to mla prakash abitkar css

First published on: 24-06-2024 at 17:05 IST

आमदार आबीटकरांमुळेच 'बिद्री'ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Neely Ledner

Last Updated:

Views: 6174

Rating: 4.1 / 5 (42 voted)

Reviews: 81% of readers found this page helpful

Author information

Name: Neely Ledner

Birthday: 1998-06-09

Address: 443 Barrows Terrace, New Jodyberg, CO 57462-5329

Phone: +2433516856029

Job: Central Legal Facilitator

Hobby: Backpacking, Jogging, Magic, Driving, Macrame, Embroidery, Foraging

Introduction: My name is Neely Ledner, I am a bright, determined, beautiful, adventurous, adventurous, spotless, calm person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.